Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे - मराठी भाषण | Lokshahir Annabhau Sathe - Marathi Speech for kids

 



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे - मराठी भाषण 

महाराष्ट्राच्या संस्कृतीला मराठी साहित्याचा खूप मोठा वारसा आहे. मराठी साहित्यामध्ये अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेले. त्यातले काही निवडक लेखक असे होते ज्यांनी गरीब लोकांच्या भावना, त्यांच्या वेदना आपल्या साहित्यातून पूर्ण जगापर्यंत पोहोचवल्या. महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेले असेच एक लेखक, शाहीर म्हणजे "अण्णा भाऊ साठे". 


त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊ साठे असे होते त्यांचा जन्म १ ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव  भाऊराव साठे आणि आईचे नाव वेळूबाई साठे असे होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दलित कुटुंबात झाला होता त्यामुळे त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही. पण ते परिस्थिती समोर डगमगले नाहीत. ते मुंबईला आले आणि काम करू लागले. पोट भरण्यासाठी त्यांनी बूटपॉलिश चे काम सुद्धा केले. 

दरम्यानच्या काळात त्यांना नायगाव मिल आणि कोहिनूर मिलमध्ये काम मिळालं. याच ठिकाणांहून खऱ्या अर्थाने त्यांचा कामगार चळवळीशी संबंध आला. 

पण काम करत असतानाही त्यांच्यातला लेखक काही शांत राहत नव्हता. त्यांनी पोवाडे, कविता आणि कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. शिक्षण कमी असून सुद्धा त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या लोकांना आवडायला लागला. त्यांच्या "फकीरा" या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. अण्णाभाऊ साठे यांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे जगभरात अगदी रशियापर्यंत पोहोचवले. 


अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे चक्क रशियामध्ये रशियन भाषेत अनुवादित केले गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी खूप मोठे योगदान दिले. 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी लिहिलेलं "माझी मैना गावावर राहिली" हे गाणे प्रचंड लोकप्रिय झालं. ह्या गाण्यातून त्यांनी चळवळीत सहभागी झालेल्या कामगारांच्या व्यथा मांडल्या. गाणं ऐकताना लोक ढसाढसा रडू लागले. अण्णाभाऊंचं हे गीत चळवळीत सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या ओठांवर होतं. 

अण्णांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी आपल्या पुस्तकातून गरीब जनतेच्या, दलित बांधवांच्या व्यथा मांडल्या. आपल्या पोवाड्यातून, शाहिरीतून गरीब कामगारांचे गिरणी कामगारांचे दुःख मांडले. त्यामुळे लोक त्यांना लोकांचे शाहीर म्हणजे "लोकशाहीर" अण्णाभाऊ साठे असे म्हणू लागले. 


अशा या थोर समाजसुधारकाला, शाहिराला मानाचा मुजरा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या